Suzuki Scooter : भारतीय बाजारपेठेत सुझुकीच्या अनेक गाड्यांनी वर्चस्व गाजवले आहे. तसेच आजही या कंपनीच्या अनेक गाड्या अधिक लोकप्रिय आहेत. ग्राहकांकडून सुझुकीच्या गाड्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीच्या स्कूटर आणि बाईक जबरदस्त मायलेज देत असल्याने ग्राहक चांगलेच आकर्षित होत आहेत.
सुझुकी कंपनीच्या अनेक स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. तसेच या स्कूटरला बाजारात चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. जर तुम्हाला सुझुकी कंपनीची Suzuki Access 125 ही स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये या स्कूटरचे मालक बनू शकता.
या स्कूटर खरेदीवर EMI पर्याय देखील दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 4759 रुपयांमध्ये ही स्कूटर खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता. या पर्यायामुळे ज्यांचे बजेट कमी आहे असे लोक देखील सुझुकी कंपनीची Access 125 ही स्कूटर खरेदी करू शकतात.
Suzuki Ride Connect ऍप्लिकेशन मिळते
जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे ही स्कूटर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या स्कूटरमध्ये एक Suzuki Ride Connect ऍप्लिकेशन देण्यात आले आहे.
ज्याद्वारे तुम्ही तुमचा फोन स्कूटरशी कनेक्ट करू शकाल. कनेक्ट केल्यानंतर, तुम्हाला स्कूटर चालवत असताना मोबाईल बाहेर काढण्याची गरज पडणार नाही. कारण मोबाईलवर आलेले सर्व कॉल किंवा मेसेज तुम्हाला स्कूटरवरच समजेल. तसेच या स्कूटरमध्ये सर्वात खास ब्लूटूथ सक्षम इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.
किंमत
भारतीय बाजारपेठेत या स्कूटरची किंमत 95,188 एक्स-शोरूम पासून सुरु होते. पण जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही फक्त 4759 रुपयांचे डाउन पेमेंट करून स्कूटर तुमच्या घरी नेऊ शकता.
यानंतर तुम्हाला बँकेकडून कर्ज दिले जाते. जे सुमारे 36 महिन्यांच्या EMI सह उपलब्ध असते. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 3,228 रुपयांचा सुलभ हप्ता भरावा लागेल. या कर्जावर तुमचे सुमारे 9.5% व्याजदर आकारले जाईल.