Mahindra SUVs Discounts : जर तुम्ही महिंद्रा कंपनी कार प्रेमी असाल आणि तुम्ही महिंद्रा कंपनीची कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीकडून निवडक कार्सवर बंपर सूट दिली जात आहे.
महिंद्रा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सूटचा तुम्हीही फायदा घेऊ शकता. कंपनीकडून महिंद्रा बोलेरो, बोलेरो निओ, महिंद्रा मराझो, महिंद्रा XUV300 या कारवार सूट दिली जात आहे. जर ही कार खरेदी करत असाल तर तुमचे ७० हजार रुपये वाचतील.
कंपनीने स्कॉर्पिओ एन, स्कॉर्पिओ क्लासिक, थार आणि XUV700 या सर्वात लोकप्रिय मॉडेल्सवर कोणतीही ऑफर किंवा सूट दिलेली नाही. त्यामुळे फक्त खालील कारवरच सूट दिली जात आहे.
महिंद्रा बोलेरो निओ
या नवीन वर्षात कंपनीकडून महिंद्रा बोलेरो निओ या कारवर फेब्रुवारी 2023 मध्ये 59,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जी SUV च्या N10 आणि N10 मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. N4 व्हेरियंटवर 32,000 रुपयांची तर आणि N8 व्हेरियंटवर 34,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे.
महिंद्रा बोलेरो
महिंद्रा कंपनीची बोलेरो कार सर्वाधिक लोकप्रिय आहे. या कारवर कंपनीकडून 70,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. SUV च्या B6 पर्यायी टॉप मॉडेलवर कमाल सवलत उपलब्ध आहे. यानंतर, B4 आणि B6 व्हेरियंटवर अनुक्रमे 47,000 आणि 50,000 रुपयांची सूट मिळेल.
महिंद्रा XUV300
महिंद्रा कंपनीने ही कार लॉन्च केल्यापासून ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Mahindra XUV300 वर 36,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. SUV च्या W8 वर जास्तीत जास्त फायदा दिला जात आहे, तर W8 ऑप्शनल व्हेरियंटवर 35,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. W6 व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट आहे. W8 व्हेरियंटवर 10,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे.
महिंद्रा मराझो
महिंद्राने या SUV वर एकूण 37,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे, ज्यामध्ये कारच्या M2 आणि M4 Plus प्रकारांवर कमाल ऑफर मिळाली आहे. याशिवाय M6 Plus व्हेरिएंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळाली आहे.