आतापर्यंत ८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- भारतात जर लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय योग्यवेळी घेतले नसते तर आतापर्यंत देशात ८.२ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता, असे आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने केलेल्या व्यापक योजनांविषयी ते बोलत होते. सद्य:स्थितीत देशभरात ५८६ रुग्णालयांसह एक लाखाहून अधिक अलगीकरण आणि ११,५०० अतिदक्षता खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशामध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येचे विश्लेषण केले जात असून २२ मार्च रोजीचा ‘जनता कफ्र्यू’ व २५ मार्चपासून लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचासुद्घा आढावा घेत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने या कठोर निर्णयाबरोबर इतर महत्त्वाच्या उपाययोजना केल्या नसत्या तर १५ एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत ४१ टक्के वाढ अर्थात ८.२ लाख रुग्णांची भर पडली असती, असा दावा अग्रवाल यांनी केला.

कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी सरकारकडून अतिसंवेदनशील भाग अर्थातच ‘हॉटस्पॉट’ची ओळख निश्चित केली जात आहे. याशिवाय उपचारासाठी देशभरात ५८६ रुग्णालये सज्ज ठेवली आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24