अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- सध्या बॉलिवूड मधील अनेक लोकप्रिय कलाकार ड्रग्स प्रकरणात अडकलेले आहे. अशातच बॉलिवूड मधील एका कलाकाराने अत्यंत धक्कादायक विधान केले आहे.
अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या परखड मतासांठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रणवीर शौरीने नुकतेच ‘ड्रग्ज’ बाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील ड्रग सेवनाबद्दल त्याने त्याची मतं मांडली आहेत.
दरम्यान यावेळी रणवीर शौरीने गांजा भारतात लीगल करण्याबाबत भाष्य केले आहे. अभिनेता रणवीर शौरीने भारतात गांजा कायदेशीर केला जावा याबाबत भाष्य केले आहे.
अभिनेता रणवीर शौरीने वेब सीरीजच्या माध्यमातून पुनरागमन केले असून त्याची ड्रग्ज आणि अमली पदार्थांवर आधारित वेब सीरीज ‘हाय’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या वेब सीरीजचे प्रदर्शन होताच अभिनेता रणवीर शौरीने वादग्रस्त वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. जाऊन घ्या नेमका काय म्हणाला रणवीर शौरी ‘मी असे मानतो की भारतात गांजा लीगर व्हायला हवा.
हे खूप जुन्या कायद्यावर आधारित आहे. अनेक देशांमध्ये गांजा लीगल आहे. 100 वर्षं जुने कायदे अद्याप बदलले नाही आहेत. गांजा त्या कायद्यांपैकी एक आहे. गांजाबाबतीतील नियम बदलायला हवे.’
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved