पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा वाढदिवस साजरा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजित दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप शनिवारी माउली निवासात आमदार बबनराव पाचपुते व प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री हिराबहेन यांचा वाढदिवस केक कापून यावेळी साजरा करण्यात आला. भारताची वैचारिक मुख्य धारा व आपली विचारधारा याविषयी संदीप नागवडे यांनी विचार व्यक्त केले.

दादाराम ढवाण, सुभाष गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. बेरड यांनी विविध योजनांची माहिती दिली. आमदार पाचपुतेंनी आघाडी सरकारची निष्क्रियता व मोदी सरकार आल्यानंतर

जागतिक राजकारणात भारताचा वाढलेला दबदबा याविषयी मार्गदर्शन केले. ध्येयधोरणांचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. संतोष रायकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24