Categories: भारत

‘शेतकर्‍यांना दहशतवादी म्हणणाऱ्या कंगनावर केंद्राने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- काही दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. तिचे राज्य शासनाच्याविरोधात असणारे भडक वक्तव्यामुळे ती टीकेची धनी बनली.

परंतु तिने आता नुकतेच याची परिसीमा गाठली. शेतकर्‍यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दहशतवादी संबोधण्याचा अघोरी अपराध तिने केलाय.

तिच्यावर केंद्र शासनाने देशद्रोहाचा गुन्हा तिचेवर दाखल करावा. तरच शेतकरी सन्मान शासनाने राखला असे होईल, असे मत ज्येष्ठ शेतकरी नेते मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले.

कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असे चित्र दिसत असतांना यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे.

असं असतानाच कंगनानं ट्विट करून या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याने शेतकर्‍यांचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी आपली भावना व्यक्त केली.

 काय म्हणाली होती कंगना? – ‘पंतप्रधान मोदीजी, जे झोपले आहेत त्यांना जागे करता येईल. पण जे झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना कसे जागे करणार? तुम्ही कितीही समजवून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे?

हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले गेले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीचे नागरिकत्व कायद्याने हिरावले गेले नाहीय.’

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24