भारत

PM Kisan : केंद्र सरकारने जारी केली अपात्र शेतकऱ्यांची यादी, या सोप्या पद्धतीने तपासा यादीत तुमचे नाव…

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Kisan : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. मात्र या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनीही लाभ घेतला आहे.

जे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही १३ व्या हफ्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला त्याआधी अपात्र शेतकऱ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासावे लागेल.

केंद्र सरकारकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचे १२ हफ्ते देण्यात आले आहेत. मात्र लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ वा हफ्ता वर्ग करण्यात येणार आहे. त्याआधी केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देत आहे. हे पैसे ३ हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. दार चार महिन्यांनी १ हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो.

अपात्र शेतकरी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांनीही घेतला आहे. त्याबाबत केंद्र सरकारने एक यादी जाहीर केली आहे.

अशी पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी

पीएम किसान 13वा हप्ता नाकारलेली यादी तपासण्यासाठी, सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा

अधिकृत पोर्टलवर आल्यानंतर, शेतकरी कॉर्नरमधील स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड भरा आणि शोध बटणावर क्लिक करा.

यानंतर तुमच्या आधार कार्डशी संबंधित माहिती जसे तुमचे नाव, खाते क्रमांक, जन्मतारीख इत्यादी उघडेल.

जर तुमचे स्टेटस यामध्ये सक्रिय दिसत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, जर तुमचा स्टेटस Rejected दिसत असेल तर तुमचे नाव या योजनेतून काढून टाकण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office