भारत

चक्क अजीम प्रेमजी यांनी वर्षभरात 9 हजार 713 कोटींचे केले दान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- विप्रो या सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या कंपनीचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी सरलेल्या वर्षांमध्ये दिवसाला 27 कोटी म्हणजे पूर्ण वर्षामध्ये 9713 कोटी रुपये दान केले आहे. दान देण्याच्या बाबतीत अजीम प्रेमजी आजही रँकींगमध्ये टॉपला आहेत.

विप्रो कंपनीच्या सुप्रिमोंनी कोविड महामारीच्या संकट काळात आपल्या दान देण्याच्या रकमेत जवळपास 1/4 वाढ केली आहे. Edelgive Hurun India Philanthropy List 2021 अनुसार अजीम प्रेमजी पहिल्या क्रमांकावर आहेत.

तर या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर एचसीएल कंपनीचे शिव नादर आहेत. त्यांनी 1263 कोटी रुपये सामाजिक उपक्रमासाठी केले आहेत.

तिसऱ्या क्रमांकावरील मुकेश अंबानी यांनी 577 काटी, चौथ्या क्रमांकावरील कुमार मंगलम बिर्ला यांनी 377 कोटी, तर आठव्या क्रमांकावरील गौतमा अंबानी यांनी 130 कोटी रुपये दिले आहेत.

इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी 183 कोटी, ज्येष्ठ गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी 50 कोटी रुपये उपलब्ध केले आहेत.

Ahmednagarlive24 Office