Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या मते अशा महिला वेळेआधीच होतात वृद्ध, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक तत्वे सांगितली आहेत. त्याचा आजही मानवाला मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनात सफल होण्यासाठी देखील अनेक मार्ग सांगितले आहेत.

आचार्य चाणक्य यांचे विचार आणि धोरणे कठोर वाटली तरीही त्यांची तत्वे तुम्हाला सफलता मिळवून देतील. आचार्य चाणक्य यांची धोरणे अश्यक वाटत असली तरीही ती तुमच्या उपयोगाची आहेत. जीवनात तुम्हाला प्रत्येक कठीण काळात त्यांची तत्वे मदत करतील.

आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या तत्वांचा अवलंब केल्यास तुम्ही देखील कठीण प्रसंगातून बाहेर पडू शकता. आचार्य चाणक्य यांनी महिलांबद्दल देखील अनेक तत्वे सांगितली आहेत. तसेच वेळेआधी वृद्ध होणाऱ्या महिलांबद्दल आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायाच्या १७ व्या श्लोकात उल्लेख केला आहे.

चाणक्यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की लोक लवकर वृद्ध कसे होतात आणि ते कसे टाळता येऊ शकते. चला तर जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी महिलांबद्दल काय सांगितले?

अध्वा जरा मनुष्णियान वजिनां बधंन जरा ।
अमिथुन जरा स्त्रीलिंगी वस्त्राना मतपो जरा ।

चाणक्य नीतीच्या चौथ्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात असे लिहिले आहे की जे लोक नेहमी प्रवास करतात, ते नियमित नसल्यामुळे लवकर वृद्धापकाळाचे शिकार होतात. प्रवासाचा थकवा आणि अस्वच्छ खाण्याच्या सवयींचा माणसाच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.

घोडा हा एक मुक्त संचार करणारा प्राणी आहे. घोडा हा कधी म्हातारा होत नाही. मात्र जर एखाद्या व्यक्तीने घोडा पाळला असेल आणि त्याला सतत बांधून ठेवले तर तो लवकरच म्हातारा होतो. कारण ते त्याच्या भौतिक स्वरूपाच्या विरुद्ध आहे.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये स्त्रियांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर पती पत्नीला शारीरिक सुख देत नसेल तर ती असंतुष्ट राहते आणि ती लवकर वृद्ध होते. तसेच जास्त सूर्यप्रकाशात राहिल्याने देखील त्या लवकर म्हाताऱ्या होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe