Chanakya Niti : घरात चुकूनही या गोष्टींना लावू नका पाय, अन्यथा निर्माण होईल दोष…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाबद्दल तसेच इतर गोष्टींबद्दल देखील बरेच काही सांगितले आहे. त्याचा आजही मानवी जीवनात उपयोग होत आहे. तसेच घरात किंवा बाहेर वावरताना रोजच्या जीवनात अनेक वस्तुंना पाय लावत असतो.

पण घरातील किंवा बाहेरील काही वस्तुंना पाय लावणे चाणक्य नीतीनुसार चुकीचे आहे. तसेच असे केल्यामुळे दोष देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार अनेक वस्तुंना पाय लावणे चुकीचे मानले जाते.

हिंदू धर्मामध्ये अग्नीला खूप महत्व आहे. त्यामुळे अनेकजण अग्नीला देवता मानत असतात. तसेच अग्नीची पूजा देखील करतात. त्यामुळे कधीच चुकूनही अग्नीला पाय लावू नये. अग्नीला पाय लावणे म्हणजे अग्नी देवाचा अपमान आहे. जर तुमच्याकडून अशी चूक झाली तर तुम्ही अग्नीच्या पाया पडून माफी मागू शकता.

चाणक्यांच्या मते कधीही कुमारी मुलींना कधीही स्पर्श करू नये किंवा मारहाण करू नये. कारण अशा मुली देवीच्या सामान असतात अशा मुलींना पायाचा स्पर्श करणे म्हणजे देवीचा अपमान मानले जाते. जर तुमच्याकडून असे झाल्यास तुम्ही मुलीच्या पायाला स्पर्श करून माफी मागू शकता.

तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शिक्षण चुकूनही पाय लावू नका. कारण शिक्षकांना गुरु मानले जाते. त्यामुळे कधीही गुरूचा अपमान होईल असे कृत्य करू नका. तसेच वडीलधाऱ्यांना कधीही लाथ देऊ नका. असे केल्यास पाप लागते असे चाणक्यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितले आहे.

हिंदू धर्मात गायीला मातेचे रूप मानले जाते आणि लोक तिची पूजा देखील करतात. गाय पूजनीय आहे म्हणून तिच्यावर पाऊल ठेवू नका. बहुतेक लोक गायीला हाकलण्यासाठी लाथ मारतात. असे केल्याने तुम्हाला पाप लागते.

हिंदू धर्मात गायीला देव समजले जाते. तसेच हिंदू धर्माच्या काही ठराविक सणाला गायीची पूजा केली जाते. त्यामुळे गायीला कधीही पायाचा स्पर्श करू नये. असे झाल्यास तुम्ही गायीला हाताचा स्पर्श करून पाया पडून माफी मागू शकता.