भारत

Aadhaar Card New Service : घरबसल्या करता येणार आधारकार्डमध्ये बदल, UIDAI ने लॉन्च केली नवीन सेवा

Published by
Ahmednagarlive24 Office

Aadhaar Card New Service : देशात केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधारकार्ड नियमांमध्ये सतत बदल केले जात आहेत. अनेक नागरिकांच्या आधारकार्डमध्ये चुका झाल्या आहेत त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रामध्ये फेऱ्या माराव्या लागतात.

पण आता नागरिकांना आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. कारण आता UIDAI कडून नवीन सेवा लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे आता घरबसल्या आधारकार्डमध्ये बदल केले जाऊ शकतात.

देशात कुठल्याही ठिकाणी तुमचे काम असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम कागदपत्रांमध्ये आधारकार्ड मागितले जाते. त्यामुळे UIDAI ने लोकांच्या सेवेसाठी सतत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

ज्या लोकांना आधारकार्डसंबंधित काही समस्या आहेत त्यासाठी त्यांना आता कुठेही जाण्याची गरज नाही. नागरिकांना आता घरबसल्या आधारकार्डमधील समस्या सोडवता येणार आहे.

आधार कार्ड नवीन सेवा 2023

आधारकार्डमध्ये बऱ्याचवेळा अनेक चुका झालेल्या असतात. कुणाची जन्मतारीख, पत्ता, नाव अशा अनेक चुका झालेल्या असतात. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी अनेकदा आधार सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात.

त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच नागरिकांचा वेळही वाया जात होता. हे सर्व लक्षात घेऊन UIDAI ने नवीन सेवा लॉन्च केली आहे. एआय चॅटबॉट आधार मित्र असे या सुरू केलेल्या सेवेचे नाव आहे.

UIDAI नवीन एआय चॅटबॉट आधार मित्र लॉन्च केले

UIDAI नवीन एआय चॅटबॉट आधार मित्र सेवा लॉन्च केली आहे. यामुळे आता आधारकार्डधारक घरबसल्या नवीन सेवेचा फायदा घेत चुका दुरुस्त करू शकतात. तसेच आधारकार्डची स्थिती देखील जाणून घेऊ शकतात.

एआय चॅटबॉट आधार मित्र चा फायदा अशाप्रकारे होईल

प्रथम “UIDAI आधार कार्ड” uidai.gov.in

च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर, “आधार मित्र” चा बॉक्स वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील उजव्या बाजूला दिसेल, त्यावर क्लिक करा.

“आय चॅटबॉट आधार मित्र” टॅप केल्यानंतर तो उघडेल.

यानंतर, प्रारंभ करा वर क्लिक करा.

आता आपण आधार कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येबद्दल माहिती विचारू शकता.

Ahmednagarlive24 Office