Cheapest Electric Cars List : स्वस्तात खरेदी करा या इलेक्ट्रिक कार! किंमत 5 लाख रुपयांपेक्षाही कमी, पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest Electric Cars List : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील खूपच आहेत. त्यामुळे अनेकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे याचा विचार करता आता बाजारात स्वस्तातील इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च होत आहेत.

ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्या तरी त्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. पण सर्वसामान्य नागरिक महागडी इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकत नाहीत. मात्र बाजारात सर्वसामान्यांसाठी ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील इलेक्ट्रिक कार मिळत आहेत.

तुम्हाला इलेक्ट्रिक कार कार खरेदी करायची आणि बजेट कमी आहे तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता.

सध्या ऑटो क्षेत्रात ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील २ इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. तुम्ही देखील कमी किमतीत Strom Motors R3 आणि PMV Ease E इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करू शकता.

स्ट्रॉम मोटर्स R3

Brand Strom
Model Strom R3
Battery 15 kWh
Max Power 20.11 bhp
Max Torque 90 Nm
Boot Space 300 Liters
Riding Range 200 km

तुमचेही बजेट कमी आहे आणि तुम्हालाही कमी किमतीतील इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर स्ट्रॉम मोटर्स R3 कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. या कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 4.50 लाख रुपये आहे.

स्ट्रॉम मोटर्स R3 इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 200 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या कारमध्ये दोन लोक बसण्याची क्षमता आहे. यात 300 लीटरची बूट स्पेस आहे. या कारमध्ये अॅडजस्टेबल सीट्स, 3 पॉइंट सीटबेल्ट, 7 इंच टचस्क्रीन, सनरूफ, मूनरूफ, अलॉय व्हील्स यांसारख्या अनेक फीचर्स देण्यात आल्या आहेत. तसेच कारमध्ये 15 kWh क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे.

PMV Ease E

Brand PMV
Model PMV Ease E
Battery 48 Watt
Max Power 13.41 bhp
Max Torque 50 Nm
Top Speed 70 kmph
Riding Range 200 km

PMV Ease E ही इलेक्ट्रिक कार देखील तुमच्या बजेटमधीलच आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 4.79 लाख रुपये आहे. या कारमध्ये 48Wh लिथियम आयन बॅटरी बसवण्यात आली आहे.

सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक कार 200 किलोमीटरची रेंज देते. तसेच ही इलेक्ट्रिक कार ताशी 70 किलोमीटर वेगाने धावू शकते. या कारमध्ये तुम्हाला क्रूझ कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर, रिमोट पार्किंग असिस्ट सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.