देशातील नागरिकांना ‘या’ महिन्यात मिळणार कोरोनाची लस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायससवर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान आता आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारतात जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते.

भारतीय वातावरणात कोणती लस प्रभावी ठरेल हे तपासून योग्य त्या लसद्वारे कोरोना संकटावर मात करण्यासाठी लसीकरण करण्याची सूचना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया देणार आहे.

ड्रग कंट्रोलरकडून परवानगी मिळाली तर जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण सुरू होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

त्यांनी जानेवारी महिन्यातील एखाद्या आठवड्यापासून कोरोना लसीकरण सुरू होईल असे संकेत दिले. याआधी कोविड १० वर मंत्रीमंडळाची २२ वी बैठक पार पडली होती.

त्यामध्ये हर्षवर्धन यांनी असे म्हटले होते की, सहा-सात महिन्यात जवळपास ३० कोटी लोकांना लस देण्यास आम्ही सक्षम असू..तसेच सहा लसी क्लिनिकल ट्रायल स्टेजमध्ये आहे.

तीन लस या प्री-क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. काही आठवड्यात यामधील काहींना परवाना मिळू शकतो. पण लस दिल्यानंतर ही नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळावे लागणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात १ कोटी ५६ हजार २४८ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ९६ लाख ५ हजार ३९० जण कोरोनामुक्त झाले.

ही दिलासा देणारी बाब आहे. कोरोनामुळे देशात १ लाख ४५ हजार ८४३ जणांचा मृत्यू झाला. सध्या भारतात ३ लाख ५ हजार १५ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. या कोरोना सक्रिय रुग्णांवर वैद्यकीय देखरेखीत आवश्यक ते उपचार सुरू आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24