Citroen C3 Aircross Car : फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroën ने भारतीय बाजारपेठेत खूप वेगाने स्थान निर्माण केले आहे. तसेच या कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय झाल्या आहेत. आता कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन जबरदस्त कार लॉन्च केली जाणार आहे.
सिट्रोन कंपनीच्या नवीन कारचा जबरदस्त लूक समोर आला आहे. तसेच या कारमध्ये धमाकेदार फीचर्स देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. तसेच कारच्या लॉन्चची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
Citroën कंपनीकडून C3 Aircross कार 27 एप्रिल रोजी जागतिक स्तरावर लॉन्च केली जाणार आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत देखील लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना Citroën ची आणखी एक नवीन कार खरेदीचा पर्याय मिळणार आहे.
Citroen C3 एअरक्रॉस तपशील
सिट्रॉन कंपनीची नवीन C3 एअरक्रॉस कार ही ७ सीटर असणार आहे. Citroën कंपनी आधीच युरोपसह काही आंतरराष्ट्रीय ऑटो मार्केटमध्ये ही कार विकत आहे. ही कार भारतातच डिझाईन आणि विकसित केली गेली आहे.
Citroen C3 एअरक्रॉसची वैशिष्ट्ये
कंपनीकडून Citroen C3 एअरक्रॉस कारचा टीझरही जारी केला आहे. या कारमध्ये वरच्या आणि खालच्या बंपरवर स्लिम डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प सेट केले गेले आहेत. ग्राउंड क्लीयरन्स देखील चांगला देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये रॅपराऊंड टेललॅम्प, मोठी चाके आणि प्लॅस्टिक बॉडी क्लॅडिंग देण्यात आले आहे.
या कारमध्ये 10 इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील आणि उत्तम कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
मोठ्या व्हीलबेससह 5 ते 7 आसनव्यवस्था दिली जाईल. यामध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पॉवरवर, ते 110bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करेल. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन दिले जाऊ शकते.
Citroen C3 Aircross ची अपेक्षित किंमत
सिट्रॉन कंपनीकडून C3 Aircross ची एक्स-शोरूम किंमत 10 ते 15 लाख रुपये ठेवली जाऊ शकते. या कारची स्पर्धा थेट सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, मारुती विटारा, टोयोटा हायरायडरशी होऊ शकते.