भारत

मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले गरम चिमट्याने चटके !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- तीन वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले गरम चिमट्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अनाथश्रमात घडली आहे. अनाथाश्रमातील वॉर्डनने कृत्य केले आहे.

बिहारच्या कैमुर जिल्ह्यात हे अनाथश्रमात आहे. गादीवर शौच केल्याच्या कारणावरून वॉर्डनचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात तिने या लहान मुलीला क्रूर वागणूक दिली.

या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलीच्या हात आणि पायांवर जखमा होत्या. डॉक्टरांनी अधिक तपास केला असता या मुलीच्या गुप्तांगावरही दिसून आले.

यावेळी या जखमा चटका दिल्याने झाल्याचे समोर आले. अधिक तपासणी केली असता वॉर्डननेच गरम चिमट्याने हे चटके दिल्याचे कबुल केले. घरगुती कारणांमुळे वॉर्डन त्रस्त होती.

कुंटुुबातील भांडणाचा राग त्यांनी या मुलीवर काढला. या वॉर्डनला नोकरीवरून निलंबीत करण्यात आलं आहे. तसंच तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office