अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे जगात अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. भारतात देखील कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले होते, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
मात्र तरीही यंदा दिवाळीला देशभरातील बाजारातील विक्रीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली. यावर्षी दिवाळीला बाजारात सुमारे 72 हजार कोटी रुपयांची विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे.
तर यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याने चीनला थेट 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटीने ही माहिती दिली.
कॅटने एका प्रसिद्धीपत्रात म्हटलं की, 20 वेगवेगळ्या शहरांमधील अग्रगण्य वितरण केंद्रातून जमा केलेल्या अहवालानुसार, दिवाळीच्या सणात जवळपास 72 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला.
तर यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याने चीनला थेट 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या हिंसक झडपेनंतर सीएआयटीने चीन वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं.
यंदा दिवाळीला त्याचा परिणाम दिसू लागला. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया आणि राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांच्या माहितीनुसार,
यंदा चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून भारतीय दिवाळी साजार करण्याच्या कॅटच्या अभियानला देशव्यापी पाठिंबा मिळाला. “देशाचे व्यापारी आणि लोकांनी चिनी वस्तू खरेदी न केल्याने चीनला 40 हजार कोटी रुपयांचा जोरदार झटका दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved