Categories: भारत

विनोदी अभिनेता मोहित बघेल यांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- बॉलिवूडमधल्या दोन दिग्गज अभिनेत्यांचं कर्करोगनं निधन झाल्यानंतर आणखी एका कलाकाराला बॉलिवूडनं गमावलं आहे.प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचं कर्करोगानं निधन झालं.

तो २७ वर्षांचा होता. सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. तो अखेरच्या काही दिवसांमध्ये नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता.

पण कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयश आले.उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात मोहितचा जन्म झाला होता.

तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला. त्यानंतर त्याने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्याला सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात त्यानंतर काम करण्याची संधी मिळाली.

त्याने या चित्रपटात ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय पाहून सलमान खान देखील प्रचंड खुश झाला होता. पण आपल्या फिल्मी कारकिर्दीत आणखी यश मिळवण्याअगोदरच त्याचा प्रवास कायमचा थांबला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24