अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे देशभरात अनेकांचा प्राण देखील गेला आहे.
मात्र आता वॅक्सीन लॉन्च करण्यात अली असल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून, शनिवारी ही संख्या ११७१३ होती.
या संसर्गातून १ कोटी ५ लाखांहून अधिक लोक बरे झाले असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आणखी कमी म्हणजे १.३७ टक्के झाले आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ०८ लाख १४ हजार ३०४ असून त्यापैकी १ कोटी ०५ लाख १० हजार ७९६ जण बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५९० आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ५४ हजार ९१८ जणांचा बळी गेला व मृत्यूदर १.४३ टक्के आहे.
दरम्यान जगभरात १० कोटी ५९ लाख कोरोनारुग्ण असून त्यातील ७ कोटी ७५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेत २ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ७१ लाख रुग्ण बरे झाले.