India News : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल टीव्ही वाहिनीवरील चर्चेत वादग्रस्त वक्तव्या केल्याने वादग्रस्त ठरलेल्या प्रवक्त्यांना भाजपने निलंबित केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं होतं.
शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. रझा अकादमी आणि एमआयएमनं नूपूर शर्मा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शर्मा यांच्या वक्तव्यामुळं मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या, असा आरोप रझा अकादमीनं केला होता.
मुंबई पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपनं राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांचं सहा वर्षांसाठी प्राथमिक सदस्यत्त्व निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे.