Amazon Great Republic Day Sale : अनेकांचे ब्रँड स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र काहींचे बजेट कमी पडते त्यामुळे भारीतले स्मार्टफोन खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते. मात्र आता ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लागल्या आहेत.
Amazon ने प्रजासत्ताकदिनानिमित्त भन्नाट सेल लावला आहे. यामध्ये स्मार्टफोन्सवर एक से बढकर एक ऑफर दिली जात आहे. १५ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान हा सेल चालणार आहे.
स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इलेक्ट्रिक वस्तूवर मोठी सूट दिली जात आहे. महागडे स्मार्टफोन फक्त काही रुपयांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. Amazon वर OnePlus Nord 2T 5G अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे.
OnePlus Nord 2T 5G हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांकडूनही या फोनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच तुम्हालाही हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये हवा असेल तर आजच तुम्ही Amazon वरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
ऑफर आणि सवलत
OnePlus Nord 2T 5G (8GB RAM, 128GB स्टोरेज) Amazon वरून 28,999 रुपयांना खरेदी करता येईल. परंतु सेलमध्ये अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.
बँक ऑफर
हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे SBI चे क्रेडिट कार्ड असल्यास फायदा होईल. स्मार्टफोन खरेदी करताना SBI चे क्रेडिट कार्ड वापरल्यास 1,250 रुपयांची सूट मिळेल. यानंतर तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.
एक्सचेंज ऑफर
OnePlus Nord 2T 5G वर 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. परंतु 18,050 रुपयांची पूर्ण ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा जुना फोन चालल्या स्थित असेल. तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात व्यवस्थापित केल्यास फोनची किंमत 9,699 रुपये असेल.