Cinema Lovers Day : आजकाल तरुणांमध्ये चित्रपटगृहात जाणून चित्रपट पाहण्याची क्रेज खूप वाढली आहे. तसेच चित्रपट गृहात जाऊन चित्रपट कोणाला कोणाला पाहू वाटणार नाही. तुम्हीही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
चित्रपट प्रेमींचे पैसे वाचणार आहेत. कारण सिनेमा प्रेमी दिन म्हणून एक दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक ग्राहकाला 99 रुपयांमध्ये तिकीट मिळणार आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीचे प्रदर्शित झालेले चित्रपट पाहू शकता.
तसेच यादिवशी सुपर हिट झालेला चित्रपटही प्रकाशित केला जाणार आहे. तोही तुम्ही फक्त ९९ रुपयांमध्ये पाहू शकता. दरवेळेस प्रमाणे तुम्हला जास्तीचे तिकीट काढवे लागणार नाही.
कमी रुपयांमध्ये चित्रपटगृहात धमाकेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे तुम्हीही या संधीचा फायदा घेऊ शकता. तसेच तुम्ही मित्र, मैत्रिणीसोबत चित्रपट पाह्ण्याचाही प्लॅन बनवू शकता.
या दिवशी, प्रत्येक चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांना मिळेल
तुम्हाला सांगतो की 20 जानेवारी 2023 रोजी ‘सिनेमा प्रेमी दिन’ साजरा केला जात आहे. या दिवशी, तुम्हाला भारतातील चित्रपटगृहांमध्ये अतिशय स्वस्त दरात सर्व चित्रपटांची तिकिटे मिळतील. जर तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुम्ही 20 जानेवारी 2023 रोजी फक्त रु.99 मध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करू शकता.
हा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार
कमी किमतीत चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेल्या हिंदी, दक्षिण भारतीय आणि इंग्रजी भाषांमधील सर्व चित्रपटांची तिकिटे तुम्हाला मिळू शकतील, तसेच आणखी एक चित्रपट आहे जो तुम्ही ९९ रुपयांच्यातिकिटामध्ये पाहू शकता. या चित्रपटचे नाव द कश्मीर फाइल्स आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ व्यतिरिक्त तुम्ही अर्जुन कपूरचा ‘कुट्टे’, अजय देवगण आणि तब्बूचा ‘दृश्यम 2’, इंग्रजी चित्रपट ‘अवतार 2’ आणि दक्षिण भारतीय चित्रपट पाहू शकता. तुम्ही कमी किंमतीत देखील पाहू शकता.