अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- कोरोना जागृती साठी सरकारने आपल्या मोबाईच्या कॉलर ट्यून बदलून त्या मध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची,कोरोना ची जागृती करणारी कॉलर ट्यून सेट केली होती.
देशातील कोट्यवधी मोबाइल वापरकर्त्यांचे एकाच दिवशी तब्ब्ल तीन कोटी तास ३० सेकंदाची ‘कॉलर ट्यून’ ऐकण्यात वाया जात असल्याचे एका अग्रगण्य ग्राहक संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळले आहे.
हि ‘कॉलर ट्यून’ त्रासदायक असल्याचे मोठ्या प्रमाणावर सांगितले जात आहे. हि कॉलर ट्यून आतापर्यंत जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात होती.
परंतु आता ती रद्द करण्यात आली आहे अशी माहिती सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. एका जनहित याचिकेद्वारे अमिताभ यांच्या आवाजातील या ट्यून बद्दल आक्षेप घेण्यात आला होता.
कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे आणि आता लोकांमध्ये चांगल्या प्रमाणात कोरोनाची जागृती झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व मोबाइल नेटवर्क वरून हि कॉलर ट्यून ऐकवली जाते.
आपत्कालीन परिस्थिती मध्ये हि कॉलर ट्यून त्रासदायक ठरते,कारण वापरकर्त्याला फोन त्वरित स्वीकारला जाणे अपेक्षित असताना नाहक हि कॉलर ट्यून ऐकावी लागते.
त्याच्या महत्वाच्या कामातही व्यत्यय येतो आणि त्यास उशीर होतो तो वेगळाच तसेच या मुळे चीड चीड सुद्धा होते असे या संस्थेचे निरीक्षण आहे.
अमिताभ यांच्या जागी आता कलाकार जलसीन भल्ला यांच्या आवाजातील लसीकरणाचा संदेश देणारी नवी ‘कॉलर ट्यून’ ऐकवण्यात येणार आहे.