कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाले मात्र एकही लस मिळाली नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-२०१९ मध्ये चीनमधील हुवेई प्रांतात ५५ वर्ष वयाच्या व्यक्तीला प्रथम कोरोनाचा संसर्ग झाला होता. हळूहळू हा संसर्ग चीनमध्ये हातपाय पसरू लागला. त्यानंतर तो संपूर्ण जगभरात पसरला.

आता जवळपास कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही कोरोनावरती एकही लस मिळालेली नाहीये. अर्थात कोरोनावरील लसीचा पत्ताच गायब झाल्याचं दिसत आहे. कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने १३ लाख जणांचा बळी घेतला आहे.

अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशालाही कोरोनाने वेठीस आणले आहे. आतापर्यंत तेथे अडीच लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला चीनच्या हुबेई प्रांतात कोरोनाबाधीत प्रथम आढळून आला असला तरी कोरोना विषाणूच्या साथीबद्दल चीनने खूप उशिरा जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली.

चीनमध्ये आश्चर्यकारकरित्या याचा प्रादुर्भाव कमी झाला. चीनमध्ये केवळ ९२ हजार रुग्ण आढळून आले असून साडेचार हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

तसेच भारतात ८८ लाख रुग्ण असून एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसून, राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाची लाट येणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24