अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- कोरोना विषाणूने देशभर धुमाकूळ घातला असून याचा धोका वाढतच चालला आहे. आता याने आणखीन चिंता वाढवून ठेवली आहे.
कोरोनाने आता लष्करात घुसखोरी केली आहे. यामुळे दोन बीएसएफ जवानांचा मृत्यू झाला असून नवीन 41 नवीन रुग्णांची भर पडली आहे.
त्यामुळे आता कोरोनाची बाधा झालेल्या जवानांची संख्या 193 झाली आहे.दरम्यान, देशभरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
गुरुवारी आणखी 3561 रुग्ण आढळून आले असून एकूण आकडा 52,952 झाला आहे. गेल्या 24 तासात 89 रुग्णांनी दम तोडला असून
मृतांची संख्या 1783 झाली आहे. 15, 267 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 35,902 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®