Categories: भारत

कोरोना योद्ध्याच्या लेकीचे भावुक उद्गार, म्हणाली बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-मध्य प्रदेशातील जहांगिराबाद पोलीस ठाण्यातील 100 नंबर वाहनाचे ड्रायव्हर योगेंद्र सिंह सोनी यांचा महिनाभरापूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपुणामुळे मृत्यू झाला.

या कोरोना योद्ध्याच्या निष्पाप मुलांनी सीएम शिवराजसिंह चौहान यांना पत्र आणि व्हिडीओ पाठवून मदतीची हाक दिली आहे. दिवंगत ड्रायव्हर योगेंद्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा, पत्नी आणि आई यांना कोरोनाची लागण झाली होती.

ज्या दिवशी युद्ध जिंकून हे कुटुंब घरी परतलं त्याच्या दुसऱ्या दिवशी हमीदिया रुग्णालयात योगेंद्रसिंह यांचा मृत्यू झाला. आता त्यांची पत्नी रेखा सोनी यांनी शिवराज सिंह यांच्याकडे मदतीची याचना केली आहे.

त्यांची लहानगी मुलगी तनिष्का हिने मामा शिवराज सिंह यांना व्हिडीओ मेसेज पाठवला आहे. यात तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करुन पोलीस इन्स्पेक्टर होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

टीटी नगर परिसरात राहणारे योगेन्द्र सोनी यांचा 3 वर्षांचा मुलगा कृष्णा, पत्नी रेखा आणि आई विमला हे सगळे कोरोनाला हरवून घरी परतले, त्याच्या दुसऱ्या दिवशी घरातल्या कमवत्या योगेंद्र यांचा मृत्यू झाला.

इतके दिवस उलटल्यानंतरही या परिवाराच्या मदतीसाठी कुणी पुढेही आले नाही. अखेर नाईलाजाने दिवंगत कोरोना योद्ध्याच्या पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मदत मागितली आहे.

दर्जेदार शाळेत शिक्षण मिळावं, यासाठी मदतीची याचना या लहानगीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्या कुठलंही उत्पन्नाचं साधन कुटुंबाकडे नाही, हेही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरी नाही आणि त्यांची मुलंही सध्या शिक्षण घेत आहेत. योगेंद्र यांच्या पत्नीला नोकरीची सर्वाधिक गरज असून, नोकरी मिळावी यासाठी त्यांनी सीएम शिवराजसिंह यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला

 मात्र त्यांची भेट होऊ शकलेली नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने अखेर सोशल मीडियाचा वापर यासाठी करण्याची वेळ या कुटुंबावर येऊन ठेपलेली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24