अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- भारतीय कार उत्पादकांनी सलग तिसर्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वाहने डिस्पॅच केली आहेत. जानेवारी महिन्यात कार उत्पादकांनी 2,95,000 ते 2,98,000 वाहनांची विक्री केली आहे.
कोरोना साथीच्या आजारामुळे बाजारात खासगी वाहनांची मोठी मागणी आहे. साथीच्या रोगामुळे लोक खासगी वाहने घेऊन सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. सलग सहावा महिना आहे कि ज्यात खासगी वाहनांच्या होलसेल वोल्यूममध्ये होणारी वाढ डबल डिजिटमध्ये दिसत आहे.
तेही अशा वेळी जेव्हा लॉकडाऊन दरम्यान या उद्योगाची कोरोना साथीने पाठ मोडली होती. गेल्या 6 महिन्यांत सरासरी मूल्य 17.65 टक्क्यांनी वाढला आहे. ETIGच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात कार मेकिंग उद्योगाच्या वार्षिक वाढीच्या तुलनेत हा दर जास्त आहे.
प्रत्येक कंपनीसाठी कार विक्रीचा वाढीचा दर वेगळा असतो आणि यात खूप फरक आहे. याचे कारण असे की काही कंपन्यांच्या कारला बाजारात जास्त मागणी असते. काही वर्षांपासून जानेवारीत वाहन विक्रीत घट पाहिली जायची.
2014 मध्ये वाहन विक्रीसाठी जानेवारी हा सर्वात वाईट महिना होता. त्याआधी 2011 मध्ये 24.7 चा विकास दर होता. परंतु आता ऑटो सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे.