कोरोनील प्रकरण : सरकार बाबा रामदेवांवर गुन्हा दाखल करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे. परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर कोरोनील हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे.

पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही बाबा रामदेव यांनी केली. परंतु राजस्थान सरकारने बाबा रामदेव यांचा कोरोनावरील ‘कोरोनिल’ या औषधाचा दावा म्हणजे फसवणूक असल्याचे म्हटले आहे.

कोरोना साथीचा आजाराचा देशभरात कहर सुरू असताना अशा प्रकारे औषध विकण्याचा प्रयत्न करणे ही चांगली गोष्ट नसल्याचे राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांनी म्हटले आहे.

या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असून आमच्या एका डॉक्टरनेही गुन्हा दाखल केला असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

मात्र, पतंजलीच्या या औषधाचे क्लिनिकल ट्रायल आम्ही जयपूरच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्चमध्ये (निम्स) केले असा दावा पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टने केला आहे. आम्ही प्रत्येक नियमाचे पालन केले असल्याचेही ट्रस्टने म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24