अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Cucumber Farming:- पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी जर शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली तर त्यांचे उत्पन्न वाढू शकते. याबाबत कृषी क्षेत्रातील जाणकार लोक वारंवार शेतकऱ्यांना प्रोत्साहित देखील करत असतात.
कृषी तज्ञांच्या (Agricultural Experts) मते, पारंपरिक पीक पद्धतीला (Traditional cropping methods) फाटा देत नगदी पिकांची लागवड केली तर निश्चितच शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फायदा होऊ शकतो.
उत्तर प्रदेश राज्यातील (Uttar Pradesh) इटावा जिल्ह्याच्या चौबिया येथील शेतकरी ब्रिजेश यादव यांनी कृषी तज्ञ यांचे हे म्हणणे खरे करून दाखवले आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बी.टेक मेकॅनिकल मधून ब्रिजेश यांनी डिग्री घेतल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरी (JOB) केली.
पण ब्रिजेश यांना मुळातच नोकरी करायची नव्हती त्यांना तर आधुनिक शेती करायची होती. त्यामुळेच ब्रिजेश यांनी नोकरीला त्यागपत्र दिले आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली.
या अनुषंगाने ब्रिजेशने पॉलीहाऊस उभारले आणि आज पोलिहाउस मध्ये काकडीची लागवड (Cucumber Cultivation) करून लाखो रुपये कमवत आहे.
या यशात फलोत्पादन विकास अभियानाचाही मोलाचा वाटा असून, त्यातून त्यांना पॉलीहाऊस बांधण्यासाठी मदत मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिजेश यादव यांनी खासगी कंपनीच्या नोकरीला लाथ मारल्यानंतर आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर लक्ष केंद्रित केले. 2016 मध्ये त्यांनी पॉलीहाऊस बांधण्याची योजना आखली.
त्यानंतर सरकारने अंमलात आणलेल्या योजनांची माहिती घेऊन संबंधित विभागांशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी 4000 चौरस मीटरमध्ये पॉलीहाऊस तयार करून घेतले.
हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना 40 लाख रुपये खर्च आला. विशेष म्हणजे यासाठी शासनाकडून 19.67 लाख रुपयांचे अनुदान देखील त्यांना मिळाले.
त्यांनी उभारलेल्या पॉलिहाऊसमध्ये 3 किलोवॅटचा सौरपंपही बसवण्यात आला, याद्वारे संपूर्ण शेतीला सिंचन केले जाऊ लागले. एवढेच नाही पाणी साठविण्यासाठी टाक्याही तयार करण्यात आल्या.
लॉकडाऊनमध्ये तोटा झाला मात्र आता लाखोंचा फायदा: पॉलिहाऊस उभारणी झाल्यानंतर आणि पाण्याचा साठा करण्यासाठी टाक्यांची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी आपल्या पॉलीहाऊसमध्ये काकडीची शेती करण्याचे नियोजन आखले.
काकडीची बाजारपेठ चांगली असल्याने यादव यांनी काकडीची शेती करण्याचे ठरवले. काकडीची लागवड केल्यानंतर त्यांना चांगले उत्पादन मिळाले शिवाय भाव देखील चांगला मिळाला.
गेल्या वर्षी काकडीचे चांगले उत्पादन झाले आणि सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. ब्रिजेश यांच्या पॉलिहाऊसमध्ये उत्पादीत केलेली काकडी इटावा आणि मैनपुरी मंडईत विकली जाऊ लागली.
मात्र असे असले तरी, लॉकडाऊनच्या काळात मंडई बंद असल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. पण आता त्यांना वर्षाला 10-11 लाख रुपयांचा नफा मिळू लागला आहे.
ब्रिजेश यांना उत्कृष्ट शेतकऱ्याचा सन्मान: यादव म्हणाले की, 2019 मध्ये त्यांना शेतीमधील चांगल्या कामगिरीमुळे उत्कृष्ट शेतकऱ्याचा सन्मानही मिळाला आहे. काकडी पिकाशिवाय ब्रिजेश 2 एकरात पेरू, सफरचंद, मनुका आणि एक एकरात सिमला मिरची, टोमॅटोची लागवड करत आहेत.
एवढेच नाही तर पॉलीहाऊस व्यतिरिक्त ते गहू आणि धानाचीही लागवड करतात. मात्र त्यानी काकडीच्या शेतीवर अधिक भर दिला आहे. कारण त्यात त्यांना चांगला नफा मिळत आहे.
ब्रिजेश यादव सांगतात की, आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच चांगला नफा मिळू शकतो. एकंदरीत ब्रिजेश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
ब्रिजेश यांच्याकडून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक शेतकरी बांधव ब्रिजेश प्रमाणे शेती करतील आणि चांगला नफा कमवतील.