7th Pay Commission DA Hike Update : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक DA वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र केंद्र सरकारकडून DA वाढीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण लवकरच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मोदी सरकारडून पुढील आठवड्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी DA वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
१ जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाऊ शकते. मात्र केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत DA वाढीच्या निर्णयास मंजुरी मिळाली आहे.
सध्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के आहे. जर केंद्र सरकारकडून ४ टक्के DA वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होऊ शकतो. हा DA कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासून लागू केला जाण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता वाढीचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार DA वाढीची घोषणा कधी करणार याकडे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
पगार 27000 वरून 1.20 लाख होईल
जर डीए 42% झाला तर कर्मचार्याला 7,560 रुपये DA मिळेल. म्हणजेच त्याला 720 रुपये अधिक मिळतील. म्हणजेच वर्षाला 8,640 रुपयांचा फायदा होईल. जर सरकारी कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,000 रुपये असेल, तर 38% दराने DA 21,280 रुपये आहे.
4% वाढीनंतर ते 23,520 रुपये होईल. वार्षिक 26,880 रुपये नफा होईल. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा 30,000 रुपये असेल, तर त्याच्या पगारात दरमहा 1200 रुपयांची वाढ होईल, यानुसार वार्षिक एकूण पगार 14,400 रुपयांनी वाढेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 2.50 लाख रुपये असेल, तर त्याचा वार्षिक पगार 1,20,000 रुपये होईल.
डीए वर्षातून दोनदा वाढतो
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करावा लागू नये यासाठी वर्षातून दोन वेळा DA वाढवला जातो. मात्र २०२३ या वर्षात कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आता लवकरच कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण १ मार्च २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत DA वाढीस मंजुरी मिळालेली आहे.
जर DA ४ टक्क्यांनी वाढला तर कर्मचाऱ्यांचा तर कर्मचाऱ्यांचा पगारही वाढेल. DA ४ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. मागील वेळेस कर्मचाऱ्यांचा DA ४ टक्क्यांनी वाढला होता.