Categories: भारत

बापरे! लग्नासाठी ८० किलोमीटर चालत गेली नवरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे विवाहेच्छुकांवर चांगलीच संक्रात आली.

लॉकडाऊनमुळे अनेक घरांतील लग्नाचे ठरलेले मुहूर्त नाईलाजाने पुढे ढकलावे लागले. मात्र, कानपूरमध्ये एका तरुणीने ८० किलोमीटर पायी चालत जाऊन संसार गाठले व लग्न केले.

गोल्डी ही १९ वर्षांची तरुणी कानपूरच्या डेरा मंगलपुर येथे वास्तव्याला आहे. कन्नौजच्या तालग्राम येथील वीरेंद्र कुमार राठोडसोबत तिचा विवाह ठरला होता.

४ मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हा विवाहसोहळा रद्द करावा लागला होता. त्यामुळे गोल्डीच्या मनाची चलबिलचल सुरु होती.

अखेर तिने कन्नौजपर्यंतचा ८० किलोमीटर पायी चालत सासर गाठले. मुलीची जिद्द पाहून अखेरी दोन्ही बाजूकडील लोकांनी पुढाकार घेत लॉकडाऊनमध्येच दोघांचे लग्न लावून दिले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24