अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले. त्यामुळे मंदीर बंद असल्याने साईभक्त शिर्डीत येत नाही. पर्यायाने विमानसेवेवर परीणाम झाला आहे.
इतर ठिकाणची विमानतळे बर्यापैकी सुरु झाली आहेत. तुलनेने शिर्डी विमानतळ मंदीर उघडल्यावरच चांगले उड्डाण घेईल. दरम्यान, 27 आक्टोबरपासून दिल्ली विमानसेवा दिवसाआड सुरु झाली आहे.
सुमारे 20 ते 25 प्रवासी या विमानाने येजा करत आहे. मार्च महीन्यापासुन कोरोनामुळे विमानसेवा बंद होती. दरम्यान, दर्शनासाठी साई मंदिर खुले करावे अशीमागणी अनेक संघटना करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved