अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- लॉकडाऊनचा निर्णय अशा परिस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने तूर्त पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करण्यात यावा, असे आदेश जारी केले आहेत.
सध्याचे तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या निवेदनात दहातोंडे यांनी म्हटले आहे की,
सध्याचे संकट काळाची गरज म्हणून हा कायदा करण्यात आला आणि लोकही या कायद्याच्या अंमलबजवणी करत केवळ पन्नास किंवा त्यापेक्षा ही कमी लोकांतही सध्या विवाह पार पडत आहेत.
एकट्या नगर जिल्ह्यात एक हजारहून अधिक विवाह या पद्धतीने झाले. गेल्या अनेक वर्षे भव्यदिव्य लग्न सोहळा करणे हे एक प्रथा झाली. खोट्या प्रतिष्ठेपाई ऐपत नसताना लोक भरमसाट खर्च करतात.