डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणाम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस मेटल आणि कच्च्या धातूंना आणखी आधार मिळाला.

अमेरिकी तेलसाठ्यात घट झाल्याने तसेच ओपेक व सदस्यांनी सातत्याने उत्पादन कपात केल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले. चीन या जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक धातूंच्या ग्राहकाकडून मागणीत भरपूर वाढ झाल्याने तांब्याचे दर वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने : कोव्हिड-१९ लसीमुळे पिवळ्या धातूवर परिणाम होत त्याचे दर काहीसे म्हणजे ०.१२% नी घसरले व ते १८०५ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. दरम्यान, अमेरिकेतील रोजगारात अचानक वृद्धी झाल्याच्या दाव्यांमुळे या घसरणीवर मर्यादा आल्या. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील कामगार बाजारावर साथीचा सातत्याने परिणाम होत असून अनेक लोक बेरोजगारीचे दावे करत आहेत. यासोबतच, अमेरिकी डॉलरमध्ये घसरण होत असल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. त्यामुळे इतर देशांकडून सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळाला. जागतिक मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणेसाठी व्याजदर कमीच ठेवण्याचा अंदाज आहे. त्यामुळेही सोन्याला आधार मिळाला. जो बिडेन यांच्या हस्तांतरणासह, कोव्हिड-१९ लसीच्या आशेमुळे पिवळ्या धातूचे दर आणखी काही प्रमाणात घसरले.

कच्चे तेल : अमेरिकी क्रूडसाठ्यात घसरण झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडने १.८ % ची वृद्धी घेतली व ते ४५.७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. कोरोना विषाणूशी लढणाऱ्या लसीच्या आशेमुळे या दरांना आणखी आधार मिळाला. यू.एस. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड स्टॉकपाइल्स ७४५,००० टनांनी वाढले. आगामी काही महिन्यांमध्ये ओपेक आणि सदस्यांकडून कठोर उत्पादन कपातीचा अंदाज आहे, त्यामुळे तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. घसरते तेल मार्केट आणि कमकुवत मागणी यामुळे ओपेक व सदस्यांकडून जानेवारी २१ पर्यंत उत्पादन कपात मागे घेतली जाईल, असा अंदाज आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये अमेरिका व युरोपमधील आर्थिक कामकाजात वाढ झाल्यानेही तेलाच्या दरांना आधार मिळाला तसेच बाजारात सकारात्मक भावना वाढीस लागल्या. कोव्हिड-१९ वरील संभाव्य लसीच्या आशेमुळे अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्यानेही तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला.

बेस मेटल : नजीकच्या काळात बेस मेटलमधील मागणीच्या चिंतेमुळे एलएमईवर धातूने संमिश्र संकेत दर्शवले. कोरोना विषाणूचा विविध जागतिक अर्थव्यवस्थांमधील वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीच्या आशावादानंतरही निरुत्साह दिसून आला. त्यामुळे बेस मेटलचे दर घसरले. वर्ल्ड स्टील असोसिएशनने जागतिक क्रूड स्टील उत्पादन ऑक्टोबर २०२० मध्ये १६२ दशलक्ष टन झाल्याचे नोंदवले. मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा हे ७ टक्के जास्त झाले. कारण चीनबाहेरील उत्पादन प्रक्रियांमध्ये सुधारणा झाली. इंटरनॅशनल लीड व झिंक स्टडी ग्रुपच्या अहवालांनुसार, ग्लोबल झिंक मार्केट सप्टेंबर २०२० मध्ये ३३,१०० टन एवढ्यावर होते.

तांबे : चीनमधून लाल धातूच्या वाढत्या मागणीमुळे एलएमई कॉपरचे दर ०.१० टक्क्यांनी वधारले व ते ७,३०० डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन झाल्यानेही दरांना आधार मिळाला.तथापि, जगात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या रुग्णांमुळे लाल धातूच्या मागणीबाबतही चिंता आहे. त्यामुळे धातूच्या नफ्यावर मर्यादा आल्या. मॉडर्ना, फायजर आणि बायोएनटेक तसेच अॅस्ट्राझेनेका या कंपन्यांनी साथीविरोधात लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत प्रगती असल्याचे नोंदवले. कोव्हिड १९ वरील संभाव्य लसीच्या आशेमुळे भविष्यात तांब्याच्या मागणीत होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24