भारत

Dhanajay Powar : हातात पिशवी घेऊन गावोगावी वायरमनचे काम ते… अस उभारलं भलंमोठं फर्निचरचं दुकान, पहा धनंजय पोवारच्या वडिलांचा खडतर प्रवास

Published by
Ahmednagarlive24 Office

Dhanajay Powar : आजकाल सोशल मीडियामुळे अनेकजण प्रसिद्धीस आले आहेत. असाच एक उद्योजक आणि फेमस रिल्सस्टार धनंजय पोवार देखील काही दिवसांपासून खूपच फेमस झाला आहे. धनंजय पोवार यांचे फॅन देखील लाखोंच्या घरात आहेत.

धनंजय पोवार हे सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. नुकतेच ते महाराष्ट्रातील फेमस कॉमेडी शो चला हवा येउद्या या कार्यक्रम देखील झळकले आहेत.

धनंजय पोवार यांच्या कॉमेडी व्हिडिओमध्ये सतत त्यांच्या घरातील आई, पत्नी, वडील आणि मुले असतात. तसेच ते त्यांच्या फर्निचरच्या दुकानात देखील चाहत्यांसोबत व्हिडीओ बनवत असतात.

धनंजय पोवार यांचे कॉमेडी व्हिडीओ अख्या महाराष्ट्रभर व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. धनंजय पोवार हे व्हिडीओ बनवत असताना सतत आईचा मार खात असतात. त्यामुळे त्यांच्या आईसोबतचे व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत असतात.

धनंजय पोवार यांना एका रात्रीत किंवा थोड्या दिवसांत प्रसिद्धी मिळालेली नाही. तर त्यांच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीमागे त्यांनाच खूप मोठा खडतर प्रवास आहे. त्यांच्या या अशा कॉमेडी व्हिडीओ बनवण्याला त्यांच्या वडिलांचा प्रचंड विरोध होता.

धनंजय पोवार यांना डीपी या नावाने अख्या महाराष्ट्रभर ओळखले जाते. त्यांचे वडिलांनी त्यांच्या जीवनात खूप खडतर प्रवास केला आहे. त्यानंतरच ते प्रसिद्ध फर्निचर उद्योजक बनले आहेत.

धनंजय पोवार यांचे वडील पाचवी इयत्तेत शिकत होते. घरातील भावंडांमद्धे ते सर्वात लहान होते. त्यांचे थोरले बंधू हे नोकरीनिमित्त मुंबईला आले मात्र इथे त्यांचा जम बसला नाही.

शेवटी गावी जाऊन त्यांनी एका फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करण्याचे ठरवले. त्यावेळी दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांना ज्या फर्निचरची आवश्यकता होती ते फर्निचर तिथे मिळत नसायचे. याचाच विचार करून त्यांच्या भावाने फर्निचरचे एक छोटेसे दुकान थाटले.

त्यांच्या या सुरुवातीच्या काळामध्ये बाहेरून फर्निचर आणावे लागायचे त्यामुळे त्यांच्या भावाला सतत बाहेरगावी जावे लागायचे. म्हणून डी पी पोवारचे वडील दुकानावर जाऊन बसायचे.

कालांतराने त्यांच्या भावंडांनी या दुकानात दुकानात भागीदारी केली त्यांनतर धनंजय पोवार यांच्या वडिलांनी यामधून बाहेर पडत पानटपरीचा व्यवसाय सुरु केला. मात्र या व्यवसायामध्ये त्यांना यश न आल्याने त्यांनी हा व्यवसाय बंद केला.

पुढे त्यांनी वायरमनचे काम करण्यास सुरुवात केली. हातात पिशवी घेऊन त्यांनी गावोगावी फिरत वायरमनचे काम करू केले. या ठिकाणी देखील त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी भावाच्या मदतीने एका छोट्या दुकानात फर्निचरचा व्यवसाय सुरु केला.

यानंतर सुरु झाला त्यांच्या भरभराटीचा प्रवास. हळूहळू त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील सुधारत गेली. यानंतर त्यांनी इचलकरंजीमध्ये ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात भलेमोठे सोसायटी फर्निचर दुकान उभे केले.

त्यांच्या या दुकानाची प्रसिद्धी झाली ती म्हणजे धनंजय पोवार याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे. अख्या कोल्हापुरात फेमस झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या फर्निचरच्या दुकानाची ख्याती पसरली.

सोसायटी फर्निचरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासोबत धनंजय पोवार आणि त्यांचे कुटुंब अतिआशय सलोख्याने वागत असते. हे सतत व्हिडिओमधून दिसून येते. धनंजय पोवार हे सतत दुकानांमध्ये येणारी ग्राहकांसोबत देखील व्हिडीओ बनवत असतात. पण त्यांच्या या प्रसिद्धीमागे त्यांच्या आई-वडिलांचा मोलाचा वाट आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office