भारत

Tourist Place In Gujarat: गुजरात राज्यात पर्यटन करायचे असेल तर ‘हे’ ठिकाण आहे खूपच सुंदर! एकदा नक्कीच भेट द्या

Published by
Ajay Patil

Tourist Place In Gujarat:- भारतामध्ये जर आपण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विचार केला तर प्रत्येक राज्यांमध्ये आकर्षित करणारे आणि निसर्गाने नटलेले असे पर्यटन स्थळे भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात.

भारतामधील असे कुठलेही राज्य नाही की त्या ठिकाणी पर्यटन स्थळे नसतील. त्यामुळे लाखोच्या संख्येने अनेक विदेशी पर्यटक देखील भारताला दरवर्षी भेट देत असतात. या अनुषंगाने आपण जर आपल्या महाराष्ट्र शेजारी असलेल्या गुजरात राज्याचा विचार केला तर भारताच्या पश्चिमेस वसलेले गुजरात हे राज्य एक प्रसिद्ध असे पर्यटन राज्य म्हणून देखील ओळखले जाते.

या ठिकाणची संस्कृती तसेच  अनेक बाबतींनी लाभलेला समृद्ध वारसा इतर अनेक गोष्टी पर्यटकांना खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत असतात. गुजरात राज्याला एक सांस्कृतिक ओळख तर आहेच परंतु त्यासोबतच अनेक ऐतिहासिक ठिकाणी देखील या राज्यात असल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे एक प्रसिद्ध राज्य मानले जाते.

याच गुजरात राज्यामधील जर आपण ढोलेरा हे एक ठिकाण पाहिले तर ते महत्त्वपूर्ण ठिकाण आहे व गुजरात राज्यातील अनेक न पाहिलेल्या ठिकाणांपैकी आणि पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिलेले ठिकाण आहे. याच ढोलेरातील काही सुंदर पर्यटन स्थळांची आपण माहिती या लेखात घेणार आहोत.

 ढोलेरा आहे गुजरात राज्यातील सुंदर ठिकाण

1- ढोलेरा धाम- ढोलेरा धाम हे गुजरात राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. या ठिकाणी असलेली स्थापित स्वामीनारायणाची मूर्ती देश विदेशातील भाविकांसोबतच पर्यटकांना देखील मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते.

या ठिकाणची मूर्ती सोबतच मंदिराची रचना देखील खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण रीतीने उभारलेली असून पर्यटकांना ती खूप आकर्षित करते व आवडते. या मंदिराच्या भिंतीवर अनेक प्रकारचे उत्कृष्ट कलाकृती देखील तुम्हाला पाहायला मिळतात.

2- ढोलेरा तलाव- तुम्हाला जर ढोलेराला भेट द्यायची असेल तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला ढोलेरा तलाव किंवा ढोलेरा लेक हे नाव सर्वप्रथम ऐकायला येते. ढोलेरा लेक वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते.

हे ठिकाण खंबातच्या खाडीजवळ असल्यामुळे त्याच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. या ठिकाणचा परिसर या तलावासोबतच पक्षांचे माहेरघर म्हणून देखील ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्हाला स्थलांतरित पक्षी देखील बघायला मिळतात.

3- ढोलेरा स्मार्ट सिटी- ढोलेरा स्मार्ट सिटी देखील पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणारा असून येणाऱ्या काळात हीच स्मार्ट सिटी असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ही स्मार्ट सिटी साधारणपणे 920 चौरस किलोमीटर परिसरामध्ये पसरली आहे. या ढोलेरा स्मार्ट सिटीमध्ये मोठमोठे इमारती आहेत. त्यासोबत उद्याने तसेच क्रीडांगणे आणि तलावांचे बांधकाम देखील केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी ढोलेरा विमानतळ देखील बांधण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत ढोलेराच्या सौंदर्यामध्ये ढोलेरा स्मार्ट सिटीची भर पडणार आहे.

 ही ठिकाणे देखील पाहू शकता

 तसेच ढोलेरा या ठिकाणी इतर काही ठिकाणी देखील पर्यटनासाठी खूप महत्त्वाचे आहेत व या ठिकाणी तुम्ही फिरून मौज करू शकता. यामध्ये श्री सहजानंद स्वामी अक्षर ओरदी, श्री गोवर्धन नाथजी हवेली आणि ढोलेरा जुम्मा मज्जिद हे ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता.

Ajay Patil