India News : भारतीयांच्या आयुर्मयादेमध्ये वाढ झाली असून भारतीयांचे सरासरी वय ६९.७ वर्षे झाले आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिमच्या २०१५-२०१९ अहवालात समोर आलं आहे. तरीही जागतिक सरासरी ७२.६ वर्षांपेक्षा ते कमीच आहे.
महाराष्ट्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आयुर्मान अधिक आहे. पुरुषांचे आयुष्य ७१.६ असून महिलांचे आयुर्मान ७४ आहे. दिल्लीचे आयुर्मान ७५.९ वर्षे आहे जे देशातील सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ केरळ, जम्मू आणि काश्मीरचा क्रमांक लागतो.
छत्तीसगडचे आयुर्मान देशात सर्वात कमी आहे. सर्वात कमी आयुर्मान असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीचे आयुर्मान ६५.३ वर्षे आहे. तर १९७०-७५ मध्ये, यूपीचे आयुर्मान केवळ ४३ वर्षे होते.
त्यानुसार यंदा म्हणजेच २२.६ वर्षांनी वाढ झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत जपानमध्ये सर्वाधिक आयुर्मान आहे. जपानचे आयुर्मान ८५ आहे. मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये सर्वात कमी ५४ वर्षे आयुर्मान आहे.
भारताच्या शेजारील बांगलादेशचे आयुर्मान ७२.१ वर्षे आहे. नेपाळमध्ये जन्माचे आयुर्मान ७०.५ वर्षे आहे. UNच्या मानव विकास अहवाल २०१९ नुसार, दोन्ही देशांमध्ये नवजात मृत्यू दर (२८ – २४) भारतापेक्षा कमी आहे.