अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळल्याचे पैसे 10 वर्ष झाले तरी मिळाले नसल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने केला आहे.
हॉगला 2010च्या आयपीएल लिलावात कोच्ची संघाने 4,52,000 अमेरिकन डॉलरला संघात घेतले होते. हॉगने ट्विटमध्ये म्हटले आहे की, खेळाडूंना अद्याप फक्त 35 टक्के पैसे मिळाले आहेत, जे आयपीएलमध्ये 10 वर्षापूर्वी कोच्ची संघाकडून खेळले. हे खेळाडू उर्वरित रक्कम मिळण्याची वाट पाहत आहेत.
संबंधित पैसे मिळण्याची काही शक्यता आहे का? हे पैसे बीसीसीआय देऊ शकते का? 2011च्या बीसीसीआयने आयपीएलमधील संघांची संख्या ८ वरून १० केली होती. यात कोच्ची टस्कर्स आणि पुणे वॉरिअर या दोन संघांचा समावेश होता.
कोच्ची संघाने बँक हमी रक्कम दिली नव्हती म्हणून् एक वर्षानंतर बीसीसीआयने कोच्ची संघासोबतचा करार रद्द केला होता.
संघ व्यवस्थापनात वाद झाल्याने बीसीसीआयला पैसे मिळाले नव्हे आणि त्यामुळेच त्यांचा करार रद्द केला होता. या संघाकडून खेळलेले असे अनेक खेळाडू होते ज्यांना अद्याप त्यांचे पैसे मिळाले नाहीत.
दरम्यान, हॉगने आयपीएलमधील 14 सामन्यात 285 धावा केल्या होत्या. त्याची सरासरी 35.63 इतकी होती. कोच्ची संघाकडून हॉगचे 1 लाख 27 हजार डॉलर येणे बाकी आहेत.