Categories: भारत

घृणास्पद ! महिलांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये कपडे काढत घातला गोंधळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परठिकाणावरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. असेच मुंबईवरून आलेल्या बार डान्सर यांना मुरादाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

यावेळी त्यांनी बिअरची मागणी करीत सेंटरमध्ये धुडगूस घातला. काही महिलांनी स्वत:चे कपडे काढण्यास सुरवात केली. त्यांनतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

एसएसपी अमित पाठक यांनी सांगितले की, एमआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये मुंबईतील आदर्श कॉलनीतून परतलेल्या महिलांना ठेवण्यात आले होते. महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी तयार नव्हती.

कसंबसं त्यांना एमआयटीपर्यंत आणण्यात आले. यानंतर सायंकाळी 5 वाजता या महिलांनी धुडघुस घातला. या महिलांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे बिअरची मागणी केली.

विरोध केल्यास एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला एमआयटी हॉस्टेलमधील बाल्कनीतून खाली लटकवून धमकी दिली.

जर बिअर आणून दिली नाही तर ती मुलाला खाली फेकून देईन. यादरम्यान काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर असाच गोंधळ घालून अशी धमकी महिला देत होत्या.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24