डॉक्टरांनीच केला कोवॅक्सिनला विरोध, केली ह्या लशीची मागणी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी भारत बायोटेकने विकसित केलेली कोरोनावरील स्वदेशी लस ‘कोवॅक्सिन’वर आक्षेप घेत ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या कोविशिल्डचा डोस देण्याची मागणी केली.

यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय अक्षीक्षकांना पत्र पाठवले आहे. आपल्या रुग्णालयात सीरमने उत्पादित केलेल्या कोविशिल्डऐवजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला प्राधान्य देण्यात येत असल्याचे समजले.

कोवॅक्सिनच्या अद्याप पूर्ण चाचण्या झालेल्या नसल्यामुळे आम्हाला या लसीच्या सुरक्षिततेबाबत संशय आहे. यामुळे अनेक जण लसीकरणात सहभागी होण्याचे टाळतील.

परिणामी लसीकरणाचा हेतूच पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व चाचण्या पार केलेल्या कोविशिल्डचे डोसच आम्हाला देण्यात यावे, असे या पत्रात डॉक्टरांनी नमूद केले.

कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १ लाख ६५ हजार ७१४ लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.

देशभरातील ३,३५१ केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली. १६,७५५ कर्मचारी या लसीकरण मोहिमेत सहभागी झाले होते. आंध्रप्रदेशात सर्वाधिक १६,९६३ जणांना लस देण्यात आली.

लसीकरणासाठी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींचा वापर करण्यात आला. या लसींचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. लस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले

अहमदनगर लाईव्ह 24