Health Tips : डिप्रेशन याचाच अर्थ नैराश्य, हे नैराश्य पुरूष किंवा स्त्री दोघांपैकी कोणालाही येते. तुम्ही बऱ्याचदा हा शब्द ऐकला असेल. परंतु, तुम्हाला त्याच्या गंभीरतेबद्दल माहित नसेल. आजकाल तरुण वर्ग जास्त डिप्रेशनमध्ये जात असल्याचे दिसत आहे.
आजकाल ही समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसत आहे. तसेच त्याची लक्षणेही वेगवेगळी दिसतात.डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत असते, त्यामुळे त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.
नैराश्याचा संबंध हा मानसशास्त्रात मनाच्या भावनांशी संबंधित दु:खाशी आहे. जो एक रोग समजला जातो. काही वेळेस ही स्थिती अधिक गंभीर होते. जेव्हा काहीजण बहुतेक प्रेमप्रकरणाशी संबंधित नैराश्य असेल तर त्यांना कोणतेही काम करू वाटत नाही. नैराश्यात व्यक्तीला असहाय्य आणि हताश वाटते. तसेच , लोकांना वेगवेगळ्या प्रकारे नैराश्याचा अनुभव येऊ शकतो.
दुःख आणि एकटेपणाची भावना
उदासीनता हा एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे, ज्यात सतत दुःख आणि कोणत्याही गोष्टीतील रस कमी होतो. ही काही दिवसांची समस्या नसून तो एक दीर्घकालीन आजार आहे. त्याची सरासरी वेळ 6-8 महिने आहे.
अधूनमधून किंवा थोड्या काळासाठी दुःख, दुःखाची भावना किंवा निराशा असणे सामान्य आहे.ही समजा जर ही लक्षणे जास्त वेळ राहिली तर ती चिंतेची बाब होऊ शकते. यातून असलेल्या लोकांसाठी निराशेवर मात करणे अवघड असते. त्यांच्या मनात असंतोष कायम असतो. यातून जात असलेले लोक सहसा विनाकारण दुःखी वाटतात.
झोपेवर होतो परिणाम
जर तुम्ही डिप्रेशनमधून जात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो. झोपेच्या पद्धतींमध्ये बदल, जसे की निद्रानाश किंवा जास्त झोप येणे ही नैराश्याची लक्षणे आहेत.
चिंता
नैराश्य असलेल्या लोकांना इतरांपेक्षा चिंताग्रस्त वाटू शकते. हे लक्षात ठेवा की जर हे कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय घडत असेल तर ती व्यक्ती नैराश्यातून जात असल्याची शक्यता आहे.
असा करा उपाय
जर कोणी या समस्येतून जात असेल तर कुटुंबातील सदस्यांनी नैराश्याने ग्रस्त त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. तसेच त्यांना समजून घ्या, त्यांना आधार द्या त्यामुळे त्यांचे नैराश्य दूर होईल.
शिवाय नैराश्य टाळण्यासाठी डॉक्टरांशी बोलून त्यांना तुमची परिस्थिती समजावून सांगा. नकारात्मक भावनांना तुमच्यापासून दूर ठेवण्याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता. तसेच आठवड्यातून तीन ते पाच दिवस ३० मिनिटे व्यायाम करा.