अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु या काळात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या काळात गर्भचाचणी करण्याची किट्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमची विक्री दुप्पट झाली आहे.
लॉकडाऊनपूर्व काळात एका महिन्याला गर्भनिरोधक गोळ्यांचे पाच ते सहा डब्बे विकले जायचे मात्र आता आठवड्याला 10 पेक्षा जास्त डब्यांची विक्री होत असल्याची माहिती एका फार्मासिस्टने दिली आहे.
दिल्लीतील हिंदुराव रुग्णालयाचे सीएमओ आणि मानसिक रोगाचे डॉक्टर जितेंद्र कुमार म्हणतात लॉकडाऊन काळात कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढणे सामान्य आहे.
लोक तणावमुक्त असल्याने आणि भरपूर वेळ मिळत असल्याने लैंगिक जीवनाचा आनंद घेत आहेत यात काही वावगे नाही. गाझियाबाद येथील ‘अपोलो फार्मसी’च्या फार्मासिस्टने याबाबत माहिती देताना सांगितले की,
लॉकडाऊन लागू झाल्यापासून अँटी बायोटिक्स औषधांची मागणी घटली आहे. मात्र कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भचाचणी करण्याच्या किट्सच्या विक्रीत वाढ झाली आहे.
अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम आणि गर्भचाचणी किट्सची मागणीही वाढल्याची माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊनच्या आधी अँटी बायोटिक्स गोळ्यांची विक्री जोमात सुरू होती,
मात्र लॉकडाऊन काळात यात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. या काळात डोकेदुखी आणि अंगदुखीच्या गोळ्या, जेल, स्प्रे यांची मागणी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com