गोमूत्र प्यायल्याने मला कोरोना झाला नाही – खा. प्रज्ञा सिंह ठाकुर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान भाजप नेते वादग्रस्त वक्तव्य करत असून भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी ही आता एक नवे वक्तव्य केले असून यानंतर त्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत.

भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी गोमुत्राचा अर्क घेतल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होत असल्याचं म्हटलं. “मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही.

मला कोरोनाही झाला नाही. सर्व लोकांनी स्वदेशी गायीचं पालन केलं पाहिजे,” असंही त्या म्हणाल्या. भोपाळमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी यावर भाष्य केलं. प्रत्येक व्यक्तीनं पिंपळ, वड आणि तुळस लावली पाहिजे.

असं केल्यास अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासणार नसल्याचंही म्हटलं. यावेळी त्यांनी भोपाळमध्ये १ कोटी वृक्षारोपणाची घोषणा केली.

तसंच ही झाडं जगवण्यासाठी पाण्याच्या टँकर्सचीही व्यवस्था केली जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर दिवसाला चार हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे.

सध्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जाता आहेत घरगुती उपचार सुचवले जात आहेत त्यामुळे वाढणाऱ्या संभ्रमात भर घालण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करू नये. साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24