अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढला जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीत घातपात घडवण्याचा पाकिस्तानचा कट असून यासाठी तेथे तब्बल 308 ट्विटर हॅण्डल सक्रीय आहेत. दिल्ली पोलिसांनी रविवारी हा मोठा खुलासा केला. गुप्तचर यंत्रणांकडून पाकिस्तानच्या कटकारस्थानांची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अलर्ट झाले आहेत.
ट्रॅक्टर रॅलीला कडेकोट सुरक्षा पुरवली जाणार आहे. दिल्लीतील सिंघू सीमेपाशी मागील कित्येक दिवासंपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर शेतकरी 26 जानेवारी म्हणजेच देशाच्या प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडसाठी सज्ज झाले आहेत.
पण, त्याच्या या शांततापूर्ण संचलनामध्ये पाकिस्तानकडून काही अडचणी उभ्या केल्या जाऊ शकतात असा इशारा दिल्ली पोलिसांकडून देण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या या कावेबाजपणाची माहिती समोर आली.
दरम्यान, अखेर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी परवानगी दिली. यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखत शांततापूर्ण मार्गानं ही परेड पार पाडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. रॅलीनंतरही आंदोलन सुरूच राहणार 26 जानेवारीची ट्रॅक्टर रॅली शांततेत काढली जाईल.
त्यानंतरही आमचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार शेतकरी नेते बलबीर सिंह यांनी व्यक्त केला. जोपर्यंत आम्ही व्यासपीठावरून कुठलीही घोषणा करीत नाही, तोपर्यंत कुणावरही विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.