अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणावरून बॉलिवूड मध्ये मोठी खळबळ माजली आहे.
दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याला एनसीबीने पुन्हा समन्स बजावले आहे.
ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जुन रामपाल याला उद्या (16 डिसेंबर) पुन्हा बोलावण्यात आलं आहे. तर, अर्जुन रामपाल याचा मेहुणा अॅगिसिलोस डेमेट्रियड्स याचा जामीन आज (15 डिसेंबर) मंजूर झाला आहे.
त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. एनसीबीने यापूर्वीही अर्जुन रामपाल याला चौकशीसाठी बोलावलं होतं. 17 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपाल याची सहा तास चौकशी झाली होती.
यात अर्जुन रामपाल याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अर्जुन रामपालने मागील चौकशीनंतर एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हत्या करणे चुकीचे असल्याचे म्हणाला होता.
माझा ड्रग्जशी काही संबंध नाही. पण या प्रकरणात एनसीबी जे काम करत आहे ते बरोबर आहे. एनसीबी चौकशी करीत असलेल्या प्रकरणांमध्ये एनसीबीलाही खात्री पटली आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याचे पुढे रामपाल म्हणाला होता.