अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- जगभरात सध्या कोरोना लस येत आहेत, जागतिक आर्थिक आणि व्यापार विषयक परिस्थिती सुधारेल या दृष्टिकोनातून सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ लागली आहे. परिणामी सोन्याच्या दरात घट होऊ लागली आहे.
शुक्रवारी सोन्याचे दर 102 रुपयांनी कमी होऊन 48,594 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा ( Silver price today ) दर 16 रुपयांनी कमी होऊन 62,734 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 1,836 रुपये प्रति औंस डॉलरवर स्थिर राहिले. सोन्याच्या दरात घट होत असल्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक व्यापार आणि उद्योग सुधारण्याची लक्षणे असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत.
त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी आकर्षक झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र जोपर्यंत अमेरिकेतील पॅकेज जाहीर होत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने सोन्याच्या भविष्याबाबत निश्चित वक्तव्य केले जाऊ शकणार नाही.