ह्या कारणामुळे होतोय राम मंदिराच्या बांधकामाला विलंब

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- अयोध्या येथील शरयू नदीच्या किनारी भव्य राममंदिरासाठी निश्चित केलेल्या जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने निर्माण कार्याला उशीर होत आहे.

जमिनीखालील पाण्यामुळे मंदिराच्या पायाच्या आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यासाठी वेळ लागत असल्याचे गुरुवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्तमंडळाचे महासचिव चंपत राय यांनी स्पष्ट केले.

मात्र, या समस्येवर लवकरच तोडगा काढून मंदिराच्या पायाला अंतिम स्वरूप देत भव्य राममंदिराच्या निर्माण कार्याला सुरूवात करण्यात येईल.

मंदिराचे बांधकामात मदत करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो व टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेडचे अभियंते व तज्ज्ञांनसोबत विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर चंपत राय यांनी संबंधित माहिती दिली. गुरुवारी झालेल्या बैठकीला विश्वस्त मंडळाचे कोषाध्यक्ष देव गिरी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24