निवडणूक रणधुमाळी ! गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील ५५ जागांव्यतिरिक्त, गोवा आणि उत्तराखंडच्यासर्व विधानसभा जागांसाठी आज सोमवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खानहे प्रमुख उमेदवार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आह़े गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत़

या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती़ मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आह़े

गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आह़े

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष),

सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या़ मात्र,

भाजपने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता़. दरम्यान उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आह़े राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत़

तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान होणार असून, ५८६ उमेदवार रिंगणात आहेत़ तसेच उत्तर प्रदेशमध्ये आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. तर उत्तराखंडमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.