Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Electric Bike : स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च! सिंगल चार्जमध्ये १२५ किमी धावणार…

भारतीय ऑटो बाजारात आता आणखी एका कंपनीने इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या बैकेमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक डवण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये तब्बल १२० किमी रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे.

Electric Bike : भारतीय बाजारात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर लॉन्च होत आहेत. बाजारातील इलेक्ट्रिक बाईकची मागणी पाहता आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाईक निर्मितीकडे अधिक भर दिला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना खरेदीसाठी अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मुंबईतील सर्वोत्कृष्ट दुचाकी कंपनी Odysse Electric Vehicles ने आपली Vader Electric बाईक बाजारात लॉन्च केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जबरदस्त फीचर्स असणारी बाईक उपलब्ध झाली आहे.

या बाईकच्या बॅटरीवर कंपनीकडून 3 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. तसेच जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची असेल तर 999 च्या टोकनसाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर Vader Electric बुक करू शकता.

कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ही इलेक्ट्रिक बाईक जुलैपर्यंत सर्व ग्राहकांना दिली जाईल. या बाईकमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी एका इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

बॅटरी आणि रेंज

Odysse Vader या इलेक्ट्रिक बाईकमध्ये IP67 AIS 156 लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. या बाईकची बॅटरी ४ तासांमध्ये १०० टक्के चार्ज होईल. कंपनीकडून दावा करण्यात येत आहे की ही इलेक्ट्रिक बाईक इको मोडमध्ये 125 किमी पर्यंतची रेंज देईल.

कमी वेळेत संपूर्ण चार्ज होत असल्याने ग्राहकांचा वेळही वाचत आहे. या बाईकमध्ये 3000 वॅटची इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की Odysse Vader कमाल 85 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

उत्कृष्ट वैशिष्ट्ये

Odysse Electric Vehicles मध्ये EV अॅपसह ऑल-एलईडी लाइटिंग, 7.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि Odysse ऑफर करत आहे. आणि त्यात उपलब्ध असलेल्या Odysse EV अॅपमध्ये बाइक लोकेटर, जिओ फेंस, इमोबिलायझेशन, अँटी थेफ्ट यांचा समावेश आहे.

ट्रॅक आणि ट्रेस आणि कमी बॅटरी अलर्ट सारखी कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये प्रदान केली जातील ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. बाईकमधील ब्रेकिंग सिस्टमसाठी या इलेक्ट्रिक बाइकमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम 240mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 220mm रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन तब्बल १२८ किलो आहे.

किंमत

Odysse Electric Vehicles ची शोरूम किंमत 1.10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 5 कलर ऑप्शनसह कंपनीकडून ही बाईक लॉन्च करण्यात आली आहे. मिडनाईट ब्लू, फायरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे सारख्या रंग पर्यायांचा समावेश आहे.