Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Electric Car and Bike : मस्तच! आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार खरेदीवर मिळवा १ लाखांची मोठी सूट, जाणून घ्या सविस्तर

Electric Car and Bike : सध्या देशात इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर अधिक भर दिला आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतामधील अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देत असल्याचे दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्या तरीही त्याचे फायदे अनेक आहेत. तसेच या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्सहन देण्यासाठी सरकारकडून देखील अनुदान दिले जात आहे.

भारतातील अनेक कंपन्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक बाईक किंवा कार खरेदीसाठी सूट दिली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये वाचत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

सरकारकडून अनुदान दिले जात असले तरीही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्सहन म्हणून वाहन खरेदीवर सूट दिली जात आहे. महत्वाचे म्हणजे काही ठराविकच कंपन्यांकडून ही सूट दिली जात आहे.

प्रत्येक राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे

नागरिकांना इलेक्ट्रिक कार किंवा बाईक खरेदी करण्यासाठी सरकारकडून प्रोत्सहन म्हणून अनुदान दिले जात आहे. प्रत्येक राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्सहन देण्यासाठी अनुदान दिले जात आहे.

सरकार व्यतिरिक्त, अनेक भारतीय कंपन्या देखील त्यांच्या कर्मचार्‍यांना इलेक्ट्रिक वाहने विकत घेण्यास प्रोत्साहित करतात जेणेकरून EV उद्योग एक जागतिक उपक्रम म्हणून विकसित होईल आणि त्यांना असे करण्याची प्रेरणा मिळेल.

काही कंपन्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी मदत मिळत असल्याने कर्मचारी सहज इलेक्ट्रिक कार किंवा बाईक खरेदी करू शकता.

अनके भारतीय कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी मदत दिली जात आहे. ईव्ही खरेदी करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्याची योजना सुरु केली आहे. कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, ते इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 30 ते 50 टक्के प्रोत्साहन देते.