Electric Car Vs Petrol Car : अनेकजण कार खरेदी करताना गोंधळात पडत असतात. कारण त्यांना त्यांच्या दररोजच्या वापरासाठी कोणती कार चांगली आहे हे माहिती नसते. त्यामुळे ते कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या विचाराने कार खरेदी करत असतात.
मात्र कुटुंबातील सदस्यांना देखील याबाबत काही जास्त माहिती नसते. त्यामुळे अनेकदा कार खरेदी करत असताना अनके चुका होतात. त्यातच आता इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कार आल्याने खरेदीदार आणखीनच गोंधळात पडला आहे.
सध्या बाजारातील इलेक्ट्रिक कारच्या किमती अधिक असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही. परिपूर्ण फीचर्स असलेली पेट्रोल कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 9-10 लाख रुपये खर्च करावे लागतील.
तसेच अशीच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 15-17 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे इलेक्ट्रिक कार पेट्रोल कारपेक्षा ८ लाखांनी महाग आहेत. त्यामुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
कारच्या किंमतीत फरक
इलेक्ट्रिक कार न घेता तुम्ही पेट्रोल कार खरेदी केली तर ८ लाख रुपये वाचतील. मात्र पुढील विचार केला तर पेट्रोल टाकण्यासाठी देखील तुम्हाला सतत पैसे खर्च करावे लागणार आहेत. मात्र इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला पेट्रोलसाठी पैसे खरेदी करावे लागणार नाहीत.
सध्या पेट्रोल शंभरी पार गेले आहे. त्यामुळे त्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. पेट्रोल कार प्रति किलोमीटर धावण्यासाठी 6-7 ते रुपयांचे पेट्रोल खर्च करते तर इलेक्ट्रिक कार प्रति किलोमीटर धावण्यासाठी 1 ते 1.5 रुपये खर्च करते.
पेट्रोल कार चालवण्यासाठी तुम्हाला दररोज त्यामध्ये पेट्रोल भरावे लागणार आहे. त्यामुळे याचा खर्च अधिक होईल. तसेच इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतर तुमची पेट्रोलपासून सुटका होईल. इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. त्यामुळे याठिकाणी तुमच्या पैशांची बचत देखील जाईल.
जर तुम्ही इलेक्ट्रिक कारचा खर्च मासिक 4,500 पकडला तर वर्षभरात फक्त 54 हजार खर्च होतील. तसेच इलेक्ट्रिक कारवर सबसिडी देखील दिली जात आहे. त्यामुळे पैशांची बचत होत आहे.